Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रम 
भाषा 
1. रोज नवीन अक्षराचे शब्दचक्र वाचन घेणे.
2. शब्दभेंडया खेळ घेणे.
3. शब्द डोंगर बनवणे.
4. धुळपाटीवर लेखन 
5. हवेत अक्षर गिरवणे.
6. समान अक्षर जोड्या लावणे.
7. शब्दांची आगगाडी बनवणे.
8. पाहुणा अक्षर ओळखणे.
9. चित्र,शब्द,वाक्य वाचन करणे.
10. बाराखडी वाचन करणे.
11. बाराखडी तक्ते वाचन करणे.
12. स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन करणे.
13.कथालेखन करणे.
14. कविता लेखन करणे.
15. संवाद लेखन करणे.
16. मराठी शब्द कोशात शब्द शोधणे.
17. अक्षर देवून शब्द तयार करणे.
18. शब्द देवून वाक्य तयार करणे.
19. चिठ्ठीत शब्द देवून 5 वाक्य सांगणे.
20.शब्दकोडे सोडवणे.
21. अक्षरगाडी तयार करणे. उदा.कप .,पर, रवा ,वात इ.
22. श्रुतलेखन सराव.
23. दुकानातील,घरातील , बाजारातील वस्तूंची यादी तयार करणे. 

गणित 
1. खडे मोजून घेणे.
2. एकमेकांकडील खडे मोजणे.
3. वर्गातील वस्तु मोजणे.
4. अवयव मोजणे .
5. कार्डसंख्या पाहून वस्तु मोजणे.
6. आगगाडी तयार करणे.
7. दोघांनी मिळून संख्या तयार करणे .
8. माळेवर मणी मोजून संख्या सांगणे. 
9. अंकांची गोष्ट सांगणे.
10. बेरीज व्यवहार मांडणी शाब्दिक व तोंडी करणे.
11.बेरीज उभी मांडणी करून करणे.
12. चौकटीची जागा बदलून उदाहरण सोडवणे.
13.बेरीजगाडी तयार करणे.
14. अंकापुढे वस्तु ठेवणे.
15. गठ्ठे सुट्टे ठेवणे.
16. मणिमाळेवर 1 ते 100 संख्यावाचन करून घेणे.
17. वस्तु निवडणे.
18. सम,विषमच्या संख्यांचा गाडया.
19. स्मरणावर आधारित खेळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा